Skip to main content

Posts

Showing posts from October, 2018

शबरीमला निकाल: कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे

शबरीमला निकालात न्यायालयाने १०-५० वयोगटातील महिलांना दर्शनासाठी असलेली बंदी उठवली हे निकालाचे लोकप्रिय आकलन आहे. पण शबरीमला निकाल म्हणजे त्याचे हे फलित एवढेच नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यात तात्विक खल असतो आणि तो खल खूप जास्त उपयोगी असतो. (बहुतांश नियतकालिके न्यायालयाच्या निवाड्याची लिंक देत नाहीत. ही बाब लेखांचा दर्जा घटवतेच , पण हेही दर्शवते कि बहुतेक लेख हे निवाड्याच्या वाचनाशिवाय लिहिले जातात. निवाडा वाचणं ही श्रमाची गोष्ट आहे. शबरीमला प्रकरणात निकालपत्र ४११ पानांचे आहे! ही लिंक ) शबरीमला प्रकरणाचा मुख्य गाभा हा धार्मिक संस्थेचे स्वातंत्र्य हे कुठवर आहे हा आहे. आणि कोर्टाचा निर्णय हे स्पष्ट करतो कि संविधानिक नैतिकता ही धार्मिक आचरणाच्या स्वातंत्र्याहून श्रेष्ठ आहे. ही एक स्वागतार्ह बाब आहे ह्यात शंका नाही. देश म्हणून तर्कशुद्धतेवर आधारित , विचारविहित सुधारणेला मोकळी आणि व्यक्तीच्या अभिव्यक्तीला समाजाच्या अस्तित्वाचा आणि उत्कर्षाचा मुख्य आधार मानणारी संविधान व्यवस्था ही गोष्ट महत्वाची आहे. आणि देशाच्या नागरिकांतही संविधानाबद्दल ही भूमिका रुजणं महत्वाचं आहे. मला आता कु...