Skip to main content

Posts

Showing posts from August, 2017

नापास नेमके कोण?

महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन ह्या दोन्ही पातळीवर इयत्ता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करण्याच्या धोरणाचा फेरविचार चालू आहे. ह्या प्रस्तावित आणि लवकरच प्रत्यक्षात येणाऱ्या बदलाबाबत 'हा बदल मुद्दलात का चूक आहे' आणि 'ह्या धोरणबदलाने काय परिणाम व्हायची शक्यता आहे' ह्याची चर्चा करणारा माझा लेख 'बिगुल' ह्या पोर्टलवर ७-८-२०१७ रोजी प्रकाशित झालेला आहे. http://www.bigul.co.in/bigul/1329/sec/8/real%20failure 'बिगुल' वरील लेखापेक्षा स्वरुपात थोडा वेगळा असा मूळ लेख इथे देत आहे. -- शालेय विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीपर्यंत अनुत्तीर्ण न करण्याचे २०११ पासून राबवण्यात आलेले धोरण आता बदलण्यात येत आहे. नव्या धोरणानुसार आठवीच्या अगोदर विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण करता येईल आणि त्यानंतर त्याला फेरपरीक्षा द्यावी लागेल. जर विद्यार्थी ह्या फेरपरीक्षेत अनुत्तीर्ण झाला तर त्याला आधीच्याच इयत्तेत रहावे लागेल. ह्या धोरणाचा पुरस्कार करणाऱ्यांच्या मांडणीनुसार विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण न करण्याच्या धोरणाने शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा ढासळलेला आहे. अनेक विद्यार्थ्यांना ते ज्य