Skip to main content

Posts

Showing posts with the label स्युडो-च्युत्याप-लिबरल

आरक्षणाच्या ताज्या घडामोडींच्या निमित्ताने काही फुटकळ निरीक्षणे

आज, म्हणजे २९ नोव्हेंबर २०१८ रोजी, मराठा आरक्षणाची सरकारी घोषणा झालेली आहे. मराठा आरक्षणाच्या आधी आलेला राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल राज्य सरकारने गोपनीय ठेवलेला आहे. पण त्याच्या निष्कर्षांना अनुसरून मराठा समाजाला १६% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासंदर्भात उपलब्ध आकडेवारी आणि काही आडाखे ह्यांच्या सहाय्याने मी काही निरीक्षणे नोंदवत आहे. 

शबरीमला निकाल: कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे

शबरीमला निकालात न्यायालयाने १०-५० वयोगटातील महिलांना दर्शनासाठी असलेली बंदी उठवली हे निकालाचे लोकप्रिय आकलन आहे. पण शबरीमला निकाल म्हणजे त्याचे हे फलित एवढेच नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यात तात्विक खल असतो आणि तो खल खूप जास्त उपयोगी असतो. (बहुतांश नियतकालिके न्यायालयाच्या निवाड्याची लिंक देत नाहीत. ही बाब लेखांचा दर्जा घटवतेच , पण हेही दर्शवते कि बहुतेक लेख हे निवाड्याच्या वाचनाशिवाय लिहिले जातात. निवाडा वाचणं ही श्रमाची गोष्ट आहे. शबरीमला प्रकरणात निकालपत्र ४११ पानांचे आहे! ही लिंक ) शबरीमला प्रकरणाचा मुख्य गाभा हा धार्मिक संस्थेचे स्वातंत्र्य हे कुठवर आहे हा आहे. आणि कोर्टाचा निर्णय हे स्पष्ट करतो कि संविधानिक नैतिकता ही धार्मिक आचरणाच्या स्वातंत्र्याहून श्रेष्ठ आहे. ही एक स्वागतार्ह बाब आहे ह्यात शंका नाही. देश म्हणून तर्कशुद्धतेवर आधारित , विचारविहित सुधारणेला मोकळी आणि व्यक्तीच्या अभिव्यक्तीला समाजाच्या अस्तित्वाचा आणि उत्कर्षाचा मुख्य आधार मानणारी संविधान व्यवस्था ही गोष्ट महत्वाची आहे. आणि देशाच्या नागरिकांतही संविधानाबद्दल ही भूमिका रुजणं महत्वाचं आहे. मला आता कु

काश्मीर: आगीतून वणव्यात?

आज १९ जून २०१८ रोजी भाजपाने पीडीपीसोबतची युती तोडली आहे. युती करण्याच्या निर्णयापेक्षा युती तोडण्याचा निर्णय कमी आश्चर्यजनक आहे. पुन्हा निवडून येण्यासाठी कुठलंही सरकार आपले निर्णय घेत असतं हे गृहीतक ध्यानात ठेवून पाहिलं तर भाजपचा युती करण्याचा आणि तोडण्याचा निर्णय समजून येऊ शकतो.      ३ वर्षांपूर्वी, काश्मीर निवडणुकांच्या नंतर भाजपाने युती केली नसती तर पीडीपी आणि कॉंग्रेस ह्यांना सत्तेत येता आले असते, अर्थात असे सरकार दुबळेच राहिले असते. भाजपच्या जम्मूमधील मतदारांना मात्र ही बाब प्रचंड लागली असती. पीडीपीसोबतच संसार सुखाचा नाही हे भाजपला तेव्हाही ठाऊक होतं. पण २५ जागा असताना सत्ता सोडून परत आपली योग्य संधी यायची वाट पाहणं का असेल तसा सत्तेचा लाभ उचलणं हा कठीण प्रश्न भाजपासमोर होता. सत्तेत येण्याचे निवडून आलेल्या लोकांना फायदे असतातच. मोठ्या योजना वगैरे यशस्वी झाल्या नाहीत तरी आपापल्या कार्यकर्त्यांच्या वर्तुळाला बळकट करायला सत्तेचा उपयोग होतोच. भाजपाने हाच प्रयोग करून बघितला.       केंद्रातील भाजप सरकार हे काश्मीरमधील फुटीरतावाद्यांवर प्रत्यक्ष आणि उघड अशी कठोर भूमिका घेणार हे स्पष्ट

Would Sardar Patel have dealt Kashmir situation better than Nehru?

Well, I think popular answer to this question is resounding YES! That's what most of the kids (or should we say most of the Hindu kinds!) hear from their relatives, how Nehru blundered in Kashmir and how Sardar was someone who could have done better. And hence what PM Modi said in Parliament today (7-2-2018) about Sardar Patel and Kashmir might not even worth noticing, because that's what most of us have implicitly agreed upon.  But that's half truth, as correctly remarked by Tharoor. Yes, Nehru committed the blunder by taking the question to UN. But Kashmir wouldn't have moved to India if it wouldn't have been for Kashmir. For detailed analysis, please read M.J. Akbar's 'Kashmir"Behind the Vale'. Yea, M.J. Akbar, who is in BJP and Minister of State for External Affairs, you read it correctly. Akbar builds up considerable evidence to show that Patel most likely had written off Kashmir. And Patel was simply being consistent. He most likely had thou

डॉक्टरांवरचे जमावी हल्ले आणि आपली मूलभूत विसंगती

    डॉक्टरांना चिडलेल्या जमावाने मारहाण करण्याची , हॉस्पिटलांचे नुकसान करण्याच्या घटना काही आत्ताच घडू लागलेल्या नाहीत . मी पहिल्यांदा अशा घटनेबाबत ऐकलं ते आनंद दिघे ह्यांच्या अपघाती मृत्यूनंतर सिंघनिया   हॉस्पिटलची नासधूस झाली तेव्हा . ही नासधूस करणाऱ्यांना काय शासन झाले हे मला माहिती नाही , पण झाले असावे असे वाटत नाही . पोलीस , राजकीय पक्ष आणि हॉस्पिटल ह्यांनी आउट ऑफ कोर्ट amicable settlement ने हा प्रश्न (?) सोडवला असण्याची शक्यता जास्त आहे . मागच्या आठवड्यात धुळे येथे डॉ . रोहन म्हा मु णकर ह्यांना झालेली मारहाण आणि त्यानंतर अशाच स्वरूपाच्या अजून काही घटना ह्यामुळे सरकारी डॉक्टरांनी वैयक्तिक स्तरावर संप पुकारला आहे . ह्या पार्श्वभूमीवर अशा घटना का होतात आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे हे का कठीण असणार आहे ह्याचा विचार ह्या लेखात आहे . -- ह्या घटनांचा विचार करण्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे कि अशी मारहाण करणारे कोण असतात ? मारहाणीच्या घटना ह्या गंभीर असल्या तरी प्रतिदिन डॉक्टर-पेशंट व्यव

जल्लिकट्टू : गोंधळलेल्या भूमिकांची अनावश्यक खडाजंगी

मूळ लेख 'जल्लिकट्टू : गोंधळलेल्या भूमिकांची अनावश्यक खडाजंगी (पूर्वार्ध) ' आणि   जल्लिकट्टू : गोंधळलेल्या भूमिकांची अनावश्यक खडाजंगी (उत्तरार्ध) ' या शीर्षकाने अक्षरनामामध्ये  अनुक्रमे २१-२-२०१७ आणि २२-१-२०१७ रोजी प्रसिद्ध झाला आहे. ब्लॉगपोस्ट व मूळ लेखात संपादकीय साक्षेपाच्या दृष्टीने केलेले काही बदल असू शकतात. पुढे पूर्ण लेख दिलेला आहे.  -- जलीकट्टूबद्दल जे आंदोलन चालले आहे त्यात आपण विचारपूर्वक काय भूमिका घ्यावी ह्या प्रश्नाचा विचार करणे हा लेखाचा उद्देश आहे. जलीकट्टूवरील बंदी चूक का बरोबर ह्याचा विचार, जलीकट्टूवरील बंदीचा सांस्कृतिकदृष्ट्या विचार करणे कसे विसंगत आहे आणि व्यक्तीस्वातंत्र्य आणि लोकशाही पद्धतीत जलीकट्टू आणि प्राणीमित्र ह्या दोघांनाही कसे स्थान आहे ह्या मुद्द्यांचा विचार ह्या लेखात केलेला आहे. जलीकट्टूवरील बंदीचे प्रमुख समर्थन हे ह्या खेळात बैलांना क्रूर वागणूक दिली जाते हे आहे. २००६ साली मद्रास उच्च न्यायालयाने पहिल्यांदा जलीकट्टूवर बंदी आणली. त्यानंतर तामिळनाडू सरकारने जलीकट्टूसाठी विशेष कायदा केला. २०११ साली केंद्र सरकारने बैलांचा समावेश खेळ, प्रद

गडकरी पुतळा: आहे हे असं आहे

मूळप्रसिद्धी: अक्षरनामा ९ जानेवारी २०१७ (लिंक इथे)  इथे प्रकाशित लेखात आणि मूळ लेखात काही बदल असतील. पण ते जुजबी आणि संपादकीय साक्षेपाचे आहेत.  --                 प्रतीके, प्रतिमा आणि ऐतिहासिक व्यक्ती ह्यांच्याबाबतच्या वादात गडकरी पुतळा हा लेटेस्ट किस्सा आहे. शिवस्मारक असो, कोणाच्या मुलाचे नाव असो कि हा पुतळा विस्थापनाचा प्रसंग असो, ह्या सगळ्याच्या सोबत उमटणाऱ्या प्रतिक्रिया प्रतीके, चिन्हे आणि ऐतिहासिक व्यक्ती ह्यांबाबत समाजात काय काय भूमिका आहेत हे दर्शवतात. मी अशा प्रतिक्रिया बघत, त्यावर विचार करत राहतो. ह्या भूमिका आणि ह्या भूमिका नेमक्या काय आहेत आणि त्यांच्याबाबत तर्कसुसंगत विचाराने काय उमजू शकते ह्याचा विचार करणे हा ह्या लिखाणाचा उद्देश आहे. समाजातील कुठल्याही घटनेबाबत वेगवेगळी मते असणे ही नैसर्गिक बाब आहे. पण अनेकदा ही मते केवळ ‘मला वाटतं असं तर असं’ किंवा’ त्यांचं असं तर आमचं का नाही’ अशा भुसभुशीत स्वरुपाची असतात. ह्या वेगवेगळ्या मतांचे  आणि त्यापाठच्या भूमिकांचे परीक्षण हे मतमतांतराचा वाद-संवाद हा निव्वळ उष्णतेपेक्षा काही एक प्रकाश पाडणारा होण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.  

Watching Afghan President in Golden Temple

I was watching a news clip where Indian PM visited Golden temple along with Afghanistan President before ‘Heart of Asia’ summit. And my first thought was of a complete cynic. ‘Shouldn’t a patriotic Indian seek apology from Afghanistan President for the plunders of Ahmed Shad Durani or Abdali?’ Then I realized that there is some poetry or design of fate in the fact that I witnessed on video: Afghanistan PM wearing a saffron shawl (उपरणे in Marathi ) in Golden Temple during the visit. Saffron was not a random choice!                 Why do I see the poetry or design? Here’s the interesting fact, not an academic explanation!               Apparently, as Wikipedia tell me, Ala Singh, may be the ruler of Patiala, had been with Abdali during the third battle of Panipat or his time in India and Ala Singh was crowned as first Sikh Maharaja at the Sikh holy temple. I am trying to highlight irony of nostalgia, much prevalent in Maharashtra, of relating Maratha empire’s actions to nationa

न्याय, सूड आणि प्रश्न

सरळ काही उलगडलेलं असण्याच्या पुढे आपण येऊन पोचलो आहोत. थोडावेळ आधीपर्यंत... १६ डिसेंबरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात एका आरोपीने अत्यंत क्रूर वर्तन केलेलं आहे. पण हा आरोपी १८ वर्षाच्या खालील असल्याने त्याला केवळ ३ वर्षाची शिक्षा होऊन तो २० डिसेंबर २०१५ ला बालसुधारगृहातून बाहेर पडणार आहे आणि त्याला त्याचे आयुष्य जगायची संधी मिळणार आहे. राग, संताप, चीड, हतबलता ह्या साऱ्या गोष्टींचं मिश्रण खदखदत आहे आणि आपण त्या मिश्रणाला सांगतोय की विवेकाने वाग. त्यात आज २० डिसेंबर २०१५. दिवसभर, आज तो सुटणार, नाही सुटणार, ह्यांचं अपील, त्यांचं अपील, कायद्याची मर्यादा, लोकांचा व्यक्त होणारा राग, आणि त्या रागाशी सहमत लोक, शेकडो. त्याच्याशी तसंच वागा जसं तो तिच्याशी वागला. तसंच, तपशीलवार. त्याला अजिबात पश्चाताप नाही, तो अधिक radicalize झाला आहे, तो परत हेच करणार. माझ्या आतला एक भाग सांगतोय, होय, त्याच्याबरोबर हेच झालं पाहिजे. त्याने जगायला नको. दुसरा भाग म्हणतोय, तू म्हणतोस हे सगळं, मग जाऊन कर. शोध त्याला. तिसरा म्हणतो, का? आता का लुळा पडतोस? का हा तुझा विवेक? का गांडूपणा? ह्यातला कुठला