Skip to main content

Posts

Showing posts from February, 2016

शेतकरी आत्महत्या: आकडे काय सांगतात? :१

      NCRB भारतातील गुन्ह्यांचा डेटा पब्लिश करते. त्यात आत्महत्येचेही आकडे असतात. ह्या लिंकवरून मला भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश ह्यांमधील आत्महत्येचे आकडे मिळालेले आहेत. २००१ ते २०१२ ह्या कालावधीसाठी ही आकडेवारी उपलब्ध आहे.        सर्वसाधारपणे शेतकरी आत्महत्या ह्या प्रिंट आणि काही प्रमाणात सोशल मीडियातून आपले लक्ष वेधून घेत असतात. ह्या बातम्या केवळ शेतकरी आत्महत्यांचे आकडे सांगतात. पण मुळात भारतात निम्म्याहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. समजा आपण असे मानले की शेतीशी निगडीत आणि निगडीत नसलेली ह्या दोन्ही गटांतील लोकांची आत्महत्या करण्याची शक्यता सारखीच असते तर आत्महत्येच्या एकूण आकड्यांत ह्या दोन गटांचे प्रमाण हे लोकसंख्येच्या प्रमाणात असेल. Table 1 : शेतीचे उपजीविकेतील आणि आत्महत्येतील प्रमाण Year % of Total Working male Population in agriculture % of male farmers in total suicides of working population ( Male)    % of female total working population in agriculture % of female farmers in total su