Skip to main content

Posts

Showing posts from January, 2017

जल्लिकट्टू : गोंधळलेल्या भूमिकांची अनावश्यक खडाजंगी

मूळ लेख 'जल्लिकट्टू : गोंधळलेल्या भूमिकांची अनावश्यक खडाजंगी (पूर्वार्ध) ' आणि   जल्लिकट्टू : गोंधळलेल्या भूमिकांची अनावश्यक खडाजंगी (उत्तरार्ध) ' या शीर्षकाने अक्षरनामामध्ये  अनुक्रमे २१-२-२०१७ आणि २२-१-२०१७ रोजी प्रसिद्ध झाला आहे. ब्लॉगपोस्ट व मूळ लेखात संपादकीय साक्षेपाच्या दृष्टीने केलेले काही बदल असू शकतात. पुढे पूर्ण लेख दिलेला आहे.  -- जलीकट्टूबद्दल जे आंदोलन चालले आहे त्यात आपण विचारपूर्वक काय भूमिका घ्यावी ह्या प्रश्नाचा विचार करणे हा लेखाचा उद्देश आहे. जलीकट्टूवरील बंदी चूक का बरोबर ह्याचा विचार, जलीकट्टूवरील बंदीचा सांस्कृतिकदृष्ट्या विचार करणे कसे विसंगत आहे आणि व्यक्तीस्वातंत्र्य आणि लोकशाही पद्धतीत जलीकट्टू आणि प्राणीमित्र ह्या दोघांनाही कसे स्थान आहे ह्या मुद्द्यांचा विचार ह्या लेखात केलेला आहे. जलीकट्टूवरील बंदीचे प्रमुख समर्थन हे ह्या खेळात बैलांना क्रूर वागणूक दिली जाते हे आहे. २००६ साली मद्रास उच्च न्यायालयाने पहिल्यांदा जलीकट्टूवर बंदी आणली. त्यानंतर तामिळनाडू सरकारने जलीकट्टूसाठी विशेष कायदा केला. २०११ साली केंद्र सरकारने बैलांचा समावेश खेळ, प्रद

गडकरी पुतळा: आहे हे असं आहे

मूळप्रसिद्धी: अक्षरनामा ९ जानेवारी २०१७ (लिंक इथे)  इथे प्रकाशित लेखात आणि मूळ लेखात काही बदल असतील. पण ते जुजबी आणि संपादकीय साक्षेपाचे आहेत.  --                 प्रतीके, प्रतिमा आणि ऐतिहासिक व्यक्ती ह्यांच्याबाबतच्या वादात गडकरी पुतळा हा लेटेस्ट किस्सा आहे. शिवस्मारक असो, कोणाच्या मुलाचे नाव असो कि हा पुतळा विस्थापनाचा प्रसंग असो, ह्या सगळ्याच्या सोबत उमटणाऱ्या प्रतिक्रिया प्रतीके, चिन्हे आणि ऐतिहासिक व्यक्ती ह्यांबाबत समाजात काय काय भूमिका आहेत हे दर्शवतात. मी अशा प्रतिक्रिया बघत, त्यावर विचार करत राहतो. ह्या भूमिका आणि ह्या भूमिका नेमक्या काय आहेत आणि त्यांच्याबाबत तर्कसुसंगत विचाराने काय उमजू शकते ह्याचा विचार करणे हा ह्या लिखाणाचा उद्देश आहे. समाजातील कुठल्याही घटनेबाबत वेगवेगळी मते असणे ही नैसर्गिक बाब आहे. पण अनेकदा ही मते केवळ ‘मला वाटतं असं तर असं’ किंवा’ त्यांचं असं तर आमचं का नाही’ अशा भुसभुशीत स्वरुपाची असतात. ह्या वेगवेगळ्या मतांचे  आणि त्यापाठच्या भूमिकांचे परीक्षण हे मतमतांतराचा वाद-संवाद हा निव्वळ उष्णतेपेक्षा काही एक प्रकाश पाडणारा होण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.