Skip to main content

Posts

Showing posts from March, 2017

डॉक्टरांवरचे जमावी हल्ले आणि आपली मूलभूत विसंगती

    डॉक्टरांना चिडलेल्या जमावाने मारहाण करण्याची , हॉस्पिटलांचे नुकसान करण्याच्या घटना काही आत्ताच घडू लागलेल्या नाहीत . मी पहिल्यांदा अशा घटनेबाबत ऐकलं ते आनंद दिघे ह्यांच्या अपघाती मृत्यूनंतर सिंघनिया   हॉस्पिटलची नासधूस झाली तेव्हा . ही नासधूस करणाऱ्यांना काय शासन झाले हे मला माहिती नाही , पण झाले असावे असे वाटत नाही . पोलीस , राजकीय पक्ष आणि हॉस्पिटल ह्यांनी आउट ऑफ कोर्ट amicable settlement ने हा प्रश्न (?) सोडवला असण्याची शक्यता जास्त आहे . मागच्या आठवड्यात धुळे येथे डॉ . रोहन म्हा मु णकर ह्यांना झालेली मारहाण आणि त्यानंतर अशाच स्वरूपाच्या अजून काही घटना ह्यामुळे सरकारी डॉक्टरांनी वैयक्तिक स्तरावर संप पुकारला आहे . ह्या पार्श्वभूमीवर अशा घटना का होतात आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे हे का कठीण असणार आहे ह्याचा विचार ह्या लेखात आहे . -- ह्या घटनांचा विचार करण्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे कि अशी मारहाण करणारे कोण असतात ? मारहाणीच्या घटना ह्या गंभीर असल्या तरी प्रतिदिन डॉक्टर-पेशंट व्यव

Yogi Adityanath as UP chief minister

        Long back before UP elections I have read some FB page which was titled as 'Yogi Adityanath as UP CM'. I guess he was no doubt a strong contender for the post, given his organizing skills. We cannot judge organizing skills when situation was tailor-made for BJP. Adityanath has been winning in his constituency from 1998, that too a Loksabha constituency, and it includes a patch of years when things were not so easy for BJP in UP. So clearly he has better leadership skills than other BJP leaders which are basically boats that have risen on strong tide. So seen from the criteria of choosing a leader with proven leadership mantle, he is a good choice. The discomfort one feels for this choice is when one considers what will be the priorities of him, seen in the light of intentions that his past reveals. Please note that I am not saying 'spiritual personality shouldn't be politically active', what I am saying is when CM of any state seems to have some disputable

नोटाबंदी, उत्तर प्रदेश निवडणुका आणि आर्थिक विकासाचा दर

उत्तर प्रदेशमधील निकालावर ज्या काही थोड्या अर्थपूर्ण टिपण्या सोशल मिडीयावर वाचण्यात आल्या त्यातल्या एका टिपणीचा सूर होता कि ' नोटाबंदीचा लोकांना त्रास झाला असता तर त्यांनी नोटाबंदी करणाऱ्यांना मतदान केले नसते . इंग्रजीत्त ज्याला witty असं म्हणतात अशा ह्या संक्षिप्त टिपणीत लिहिणाऱ्याला असं म्हणायचं होतं: ‘ नोटाबंदीचा त्रास होऊ शकतो असे अनेक लोक उत्तर प्रदेशातील मतदार आहेत . एखाद्या राजकीय पक्षाच्या निर्णयाने मतदाराला त्रास झाला तर तो त्या पक्षाला मतदान करणार नाही. ज्याअर्थी ह्या (ज्यांना त्रास झालेला असायला हवा) अनेक मतदारांनी भाजपला मतदान केलेले आहे ह्याचाच अर्थ नोटाबंदीचा लोकांना त्रास झालेला नाही .' त्यातील दोन मुद्द्यांबाबत मी थोडा अधिक विचार करण्याचा प्रयत्न करतो आहे . ते मुद्दे पुढीलप्रमाणे   १ . नोटाबंदीचा जर खरोखर लोकांवर परिणाम झाला असता तर त्यांनी नोटाबंदी करणाऱ्यांना मतदान केले नसते. २. नोटाबंदीचा लोकांना खरोखर त्रास झाला आहे का आणि झालेला त्रास हि कितपत उपद्रवकारी आहे ? ' नोटाबंदीचा जर खरोखर लोकांवर परिणाम झाला असता तर त्यांनी नोटाबंदी करणाऱ्यांना