Skip to main content

Posts

Showing posts with the label डीलेम्मा

फैजच्या ‘हम देखेंगे’ चा वाद

फैज अहमद फैजची ‘हम देखेंगे’ ही कविता हिंदूविरोधी आहे का अशा आशयाचा वाद सुरू आहे. ही कविता शोषितांचा आवाज आहे , जुलुमी राजवट संपून समतेचे राज्य येईल असा आशय व्यक्त करणारी कविता आहे असा जनरल समज आहे. मी ही कविता पहिल्यांदा कोक स्टुडीओमध्ये ऐकली होती. कवितेची सर्वात अपिलिंग बाब आहे तो म्हणजे त्यातला विश्वास, ‘हम देखेंगे ’ . पण अगदी पहिल्या वेळेला ऐकतानाही त्यातल्या इस्लामिक संदर्भांनी मला प्रश्न पाडले होते. म्हणजे वर्गसंघर्षाचे , विषमता आणि समता ह्यांच्या संघर्षाचे चित्रण करणाऱ्या कवितेत धार्मिक संदर्भ का असावेत? आणि हे धार्मिक संदर्भ कविबद्दल , त्याच्या हेतूबद्दल काय सांगतात ? कवितेत धार्मिक संदर्भ आहेत ही निर्विवाद गोष्ट आहे. पण कवितेत धार्मिक संदर्भ धार्मिक हेतूंसाठीच आहेत का हे निर्विवाद नाही. कवितेतले धार्मिक संदर्भ हे रूपकात्मक आहेत असं मला वाटतं. म्हणजे इस्लामच्या नावाखाली स्वार्थ साधणारे दांभिक व्यक्तिकेंद्री राज्यकर्ते जातील आणि इस्लामला अभिप्रेत खरी समता येईल अशा पद्धतीने हे रूपक असावं. कविता इस्लामचा उदोउदो करणारी नसून इस्लामला रूपकात्मक वापरणारी आहे असं वाटण्य...

आर्थिक मंदी: असणे आणि दिसणे

       दसऱ्याच्या संध्याकाळी घराजवळ तीन नवी दुकाने उघडलेली दिसली. शहरात नवरात्रीला जत्रा लागते त्यात गर्दी कमी नव्हती. फेसबुकवर एकाने नवी गाडी घेतल्याचा फोटो पाहिला. मला हे जे सगळं दिसलं ते चालू असलेल्या आर्थिक मंदीच्या चर्चेशी जुळणारं नाही. मागच्या महिन्या-दीड महिन्यापासून , विशेषतः जेव्हापासून वाहन क्षेत्रातील विक्री घटल्याच्या बातम्या आणि तदनुषंगिक आर्थिक मंदीच्या चर्चा वाचतो आहे तेव्हा मला कायम हा प्रश्न पडतो कि ही आर्थिक मंदी मला कशी जाणवेल ? मला ती कशी जाणवू शकते तर: १. माझी नोकरी जाणे २. माझ्या परिचयातील कोणाची नोकरी जाणे/धंदा बुडणे ३. माझ्या आजूबाजूच्या परिसरात दुकाने, खरेदी ह्यांवर परिणाम दिसणे. मला अद्याप हा परिणाम जाणवलेला नाही. मला हा परिणाम जाणवलेला नाही म्हणजे तो नाहीच असं माझं म्हणणं नाही. पण आर्थिक मंदी आहे आणि मला जाणवत नाही ह्याचं मला स्पष्टीकरण हवं आहे. हा लेख ते स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न आहे. एखाद्या निरीक्षणाचे एकच एक स्पष्टीकरण असते आणि बाकी चूक असं नसतं. त्यामुळे कमी-जास्त लागू पडणारी दोन शक्य स्पष्टीकरणे मी मांडणार आहे. वैयक्तिक...

वाङमयचौर्याची चर्चा: फुकाची वरचढ नैतिकता?

हा लेख लोकसत्तामधील ह्या लेखाला उद्देशून आहे. (प्रतीक पुरी - उजळ माथ्यानं मिरवणारं वाङ्मयचौर्य, लोकसत्ता डिसेंबर ३०, २०१८)      ‘ओरिजिनल’ ही संकल्पना माणसाला भुरळ पाडणारी आहे. विशेषतः लेखक आणि कलाकार ह्यांना ह्या संकल्पनेची फार ओढ. पण त्याचवेळी निर्मितीपाठी प्रेरणा असते असेही हाच गट मानतो. Plagiarism म्हणजे दुसऱ्याच्या संकल्पनांना आपले म्हणून सादर करणे, म्हणजेच स्वतःची अशी प्रेरणा नसणे हा ज्ञानक्षेत्रात गुन्हा मानला जातो. पण ही व्याख्या जरी सोपी असली तरी तिच्या वापरात अनेकदा ती सूक्ष्म तऱ्हेने वापरावी लागते.      एक मुद्दामून रचलेले उदाहरण बघूया. एका संशोधकाने विद्यार्थ्यांच्या पालकांना दरमहिना काही पैसे दिल्यावर त्यांच्या शाळेतील कामगिरीवर काय परिणाम होतो ह्याचा अभ्यास करण्यासाठी आफ्रिका खंडातील एका देशांत एक प्रयोग केला. दोन तुलनात्मक समान गावांपैकी एका गावातील पालकांना दरमहा पैसे देण्यात आले (कंट्रोल) आणि दुसऱ्या गावांतील लोकांना पैसे देण्यात आले नाहीत. (हा प्रयोग वैज्ञानिकदृष्ट्या योग्य रहावा म्हणून ज्या काही खबरदाऱ्या घेणे गरजेचे होते त्या घेतल्या ग...

डॉक्टरांवरचे जमावी हल्ले आणि आपली मूलभूत विसंगती

    डॉक्टरांना चिडलेल्या जमावाने मारहाण करण्याची , हॉस्पिटलांचे नुकसान करण्याच्या घटना काही आत्ताच घडू लागलेल्या नाहीत . मी पहिल्यांदा अशा घटनेबाबत ऐकलं ते आनंद दिघे ह्यांच्या अपघाती मृत्यूनंतर सिंघनिया   हॉस्पिटलची नासधूस झाली तेव्हा . ही नासधूस करणाऱ्यांना काय शासन झाले हे मला माहिती नाही , पण झाले असावे असे वाटत नाही . पोलीस , राजकीय पक्ष आणि हॉस्पिटल ह्यांनी आउट ऑफ कोर्ट amicable settlement ने हा प्रश्न (?) सोडवला असण्याची शक्यता जास्त आहे . मागच्या आठवड्यात धुळे येथे डॉ . रोहन म्हा मु णकर ह्यांना झालेली मारहाण आणि त्यानंतर अशाच स्वरूपाच्या अजून काही घटना ह्यामुळे सरकारी डॉक्टरांनी वैयक्तिक स्तरावर संप पुकारला आहे . ह्या पार्श्वभूमीवर अशा घटना का होतात आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे हे का कठीण असणार आहे ह्याचा विचार ह्या लेखात आहे . -- ह्या घटनांचा विचार करण्यासाठी महत्वाचा प्रश्न आहे कि अशी मारहाण करणारे कोण असतात ? मारहाणीच्या घटना ह्या गंभीर असल्या तरी प्रतिदिन डॉक...