Skip to main content

Posts

Showing posts from October, 2019

२०१९ चे अर्थशास्त्रातील नोबेल: प्रकाशाची छोटी आणि भक्कम बेटे

2019 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार अभिजीत बॅनर्जी , एस्थर डफ्लो आणि मायकल क्रेमर ह्यांना जाहीर झालेला आहे . २०१९ चे हे अर्थशास्त्रातील नोबेल ‘ जगभरातील दारिद्र्य निर्मूलनासाठी अमलांत आणलेल्या संशोधनात्मक पावित्र्याला ’ आहे. अभिजित बॅनर्जी स्त्रोत:  https://www.nobelprize.org/prizes/economic-sciences/2019/summary/ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स असे ह्या तिघांच्या संशोधन क्षेत्राचे ढोबळ वर्णन करता येईल . गरिबी किंवा दारिद्र्य निर्मूलन हा ह्या संशोधनशाखेचा एक भाग आहे. गरिबी हा ह्या संशोधन क्षेत्रातील महत्वाचा संशोधनविषय आहे , कारण जगातील बरीच लोकसंख्या आजही किमान जीवनमानाच्या अभावाने ग्रस्त आहे . पण ह्या तिघांच्या संशोधनाचे वैशिष्ट्य असे की एखाद्या फार्मा क्षेत्रातील संशोधकाने आपल्या जैव - रासायनिक प्रयोगांकडे बघावे तसा दृष्टिकोन ह्या तिघांनी आपल्या संशोधनात आणलेला आहे . Randomized control trials हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख सूत्र आहे . उदाहरणार्थ पाणी शुद्ध करण्याचे औषध उपलब्ध करून दिल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो ह्या प्रश्नाचा अभ्यास करायला दोन एकमेकांशी स

आर्थिक मंदी: असणे आणि दिसणे

       दसऱ्याच्या संध्याकाळी घराजवळ तीन नवी दुकाने उघडलेली दिसली. शहरात नवरात्रीला जत्रा लागते त्यात गर्दी कमी नव्हती. फेसबुकवर एकाने नवी गाडी घेतल्याचा फोटो पाहिला. मला हे जे सगळं दिसलं ते चालू असलेल्या आर्थिक मंदीच्या चर्चेशी जुळणारं नाही. मागच्या महिन्या-दीड महिन्यापासून , विशेषतः जेव्हापासून वाहन क्षेत्रातील विक्री घटल्याच्या बातम्या आणि तदनुषंगिक आर्थिक मंदीच्या चर्चा वाचतो आहे तेव्हा मला कायम हा प्रश्न पडतो कि ही आर्थिक मंदी मला कशी जाणवेल ? मला ती कशी जाणवू शकते तर: १. माझी नोकरी जाणे २. माझ्या परिचयातील कोणाची नोकरी जाणे/धंदा बुडणे ३. माझ्या आजूबाजूच्या परिसरात दुकाने, खरेदी ह्यांवर परिणाम दिसणे. मला अद्याप हा परिणाम जाणवलेला नाही. मला हा परिणाम जाणवलेला नाही म्हणजे तो नाहीच असं माझं म्हणणं नाही. पण आर्थिक मंदी आहे आणि मला जाणवत नाही ह्याचं मला स्पष्टीकरण हवं आहे. हा लेख ते स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न आहे. एखाद्या निरीक्षणाचे एकच एक स्पष्टीकरण असते आणि बाकी चूक असं नसतं. त्यामुळे कमी-जास्त लागू पडणारी दोन शक्य स्पष्टीकरणे मी मांडणार आहे. वैयक्तिकरित्या मला त्यातले दु