Skip to main content

२०१९ चे अर्थशास्त्रातील नोबेल: प्रकाशाची छोटी आणि भक्कम बेटे



अभिजित बॅनर्जी
स्त्रोत: https://www.nobelprize.org/prizes/economic-sciences/2019/summary/
Abhijit BanerjeeAbhijit Banerjee

डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स असे ह्या तिघांच्या संशोधन क्षेत्राचे ढोबळ वर्णन करता येईल. गरिबी किंवा दारिद्र्य निर्मूलन हा ह्या संशोधनशाखेचा एक भाग आहे. गरिबी हा ह्या संशोधनक्षेत्रातील महत्वाचा संशोधनविषय आहे, कारण जगातील बरीच लोकसंख्या आजही किमान जीवनमानाच्या अभावाने ग्रस्त आहे. पण ह्या तिघांच्या संशोधनाचे वैशिष्ट्य असे की एखाद्या फार्मा क्षेत्रातील संशोधकाने आपल्या जैव-रासायनिक प्रयोगांकडे बघावे तसा दृष्टिकोन ह्या तिघांनी आपल्या संशोधनात आणलेला आहे. Randomized control trials हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख सूत्र आहे. उदाहरणार्थ पाणी शुद्ध करण्याचे औषध उपलब्ध करून दिल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो ह्या प्रश्नाचा अभ्यास करायला दोन एकमेकांशी साधर्म्य असणारी गावे/वस्त्या निवडली जातात. त्यातील एका वस्तीतील काही लोकांना, जे रँडम पद्धतीने निवडलेले आहेत, त्यांना असे औषध उपलब्ध करून दिले जाते. नंतर ह्या दोन्ही वस्त्यांचे नीट निरीक्षण केले जाते. थोडक्यांत माणसांवर प्रयोग असे ह्या तिघांच्या संशोधनाचे स्वरूप आहे. अर्थात हे प्रयोग शारीरिक नसतात, तर वागणुकीबद्दलचे असतात. अर्थशास्त्राचे पायाभूत गृहीतक हे आहे की व्यक्ती incentives नुसार वागतात. त्यामुळे त्यांचे वागणे बदलायचे असेल तर त्यांच्या वागण्यापाठचे incentives बदलायला हवेत. त्या अनुषंगाने ह्या Randomized controlled trials ची रचना केली जाते. कुठल्या incentives ना लोक प्रतिसाद देतात आणि कुठल्या नाहीत हे अशा प्रयोगांतून कळते.
एस्थर डफ्लो
https://www.nobelprize.org/prizes/economic-sciences/2019/summary/


Randomized controlled trials ह्या औषध संशोधन क्षेत्रात खूप आधीपासून वापरांत आहेत. कार्यकारण (causal) परिणाम शोधण्याचा हा वैज्ञानिक म्हणजे statistical मार्ग आहे. सामाजिक विज्ञानात त्यांचा वापर प्रामुख्याने मागच्या ३ दशकांपासून होतो आहे. Randomized controlled trial ह्या खर्चिक आहेत आणि त्या बऱ्याच कालावधीसाठी चालतात. Randomized controlled trials यायच्या आधी माणसांचे निरीक्षण हे सर्व्हेद्वारे व्हायचे. सर्व्हे उपयोगी असले तरी ते कार्यकारणभाव उलगडायला फारसे उपयोगी नसतात. उदाहरणार्थ सर्व्हेमध्ये अमुक एक लोक अमुक एक प्रकारचे कपडे वापरतात असे कळते. पण त्यांना दुसरे कुठले कपडे दिले तरी ते पूर्वीच्या प्रकारचेच कपडे वापरातील का ह्याचे उत्तर सर्व्हे देऊ शकत नाही. एकतर अनेक वर्षे त्यांचे सर्व्हे करून त्यांच्या कपड्याच्या वापरातील बदल नोंदवणे किंवा त्याबद्दल केवळ सैद्धांतिक भूमिका घेणे हाच पर्याय राहतो. Randomized controlled trials ह्यापेक्षा उत्तम पर्याय ठरतो. काही सोडत पद्धतीने निवडलेल्या लोकांना समजा दुसरे कुठले कपडे वापरायची संधी दिली तर ते काय करतील हा ह्या Randomized controlled trial चा गाभा आहे.
मायकेल क्रेमर
https://www.nobelprize.org/prizes/economic-sciences/2019/summary/

सोयीस्कर, एकाच समूहापुरते मर्यादित सर्व्हे, आपल्या अनुभवांवर आधारित आणि अनेकदा अत्यंत ideological अशा भूमिका अशा सबगोलंकार अवस्थेतून सांख्यिकीच्या दृढ आधारावर निष्कर्ष काढणारे वैज्ञानिक संशोधनक्षेत्र अशा अवस्थेत डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स आले आहे त्यात ह्या त्रयीचा मोठा वाटा आहे.   

अभिजीत बॅनर्जी आणि एस्थार डाफ्लो ह्यांनीपुअर इकॉनॉमिक्सहे एक उत्तम पुस्तक लिहिलेले आहे. दारिद्र्य निर्मूलनाच्या प्रयत्नांचा आणि त्याच्या यशापायशाचा त्यात आढावा आहे. दारिद्र्य निर्मूलनाच्या अनेक बाजू, जसे भूक, आरोग्य, इन्शुरन्स, कर्ज, शिक्षण ह्यांवर ह्या पुस्तकांत यथासांग चर्चा आहे. हे पुस्तक ह्या विषयांत रुची असलेल्या वाचकांसाठी आहे तसेच डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स विषयाचे पाठ्यपुस्तक म्हणूनही ते उपयोगी आहे. (पुस्तकाची वेबसाईट) ह्या पुस्तकातील शिक्षण विषयावरचे प्रकरण ही शिक्षणाबद्दलची सर्वात प्रागतिक (pragmatic) मांडणी असावी. 

अभिजीत बॅनर्जी ह्यांच्या संशोधनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा लहान-लहान पण rigorous प्रयोगांवरचा फोकस. देश, जग अशा मोठ्या मोठ्या पातळीबाबत त्यांचे शोधनिबंध फार बोलत नाहीत. काही गावांपुरत्या/वस्त्यांपुरत्या मर्यादित पण काटेकोर प्रयोगातून मानवी वर्तणुकीबद्दल अधिकाधिक माहिती मिळवणे हीच त्यांच्या प्रयोगाची दिशा आहे.

त्यांचा presumptions of growth policy असा एक निबंध आहे. आर्थिक वाढीसाठी काय काय करता येईल हा अनेक देशांपुढचा यक्षप्रश्न असतो. दारिद्र्य निर्मूलन आणि आर्थिक वाढ ह्यां दोन प्राधान्य असलेल्या समस्यांपैकी कुठली सोडवावी किंवा त्यांना किती प्राधान्य वाटून घ्यावे हे विकसनशील देशातील पॉलिसी मेकर्स न ठरवावे लागते. आर्थिक विकासातून दारिद्र्य निर्मूलन असे सध्याचे प्रस्थापित शहाणपण आहे.  Grand स्कीम्स हा राज्यकर्त्यांचा आवडीचा विषय आहे. आर्थिक वाढीसाठी काय क्लृप्ती आहे हे राजकीय नेते आणि त्यांचे आर्थिक सल्लागार ह्यांना पडलेले कोडे अजून सुटलेले नाही. अभिजित बॅनर्जी ह्यांच्या निबंधातला हा शेवटचा परिच्छेद त्यांची भूमिका नीट मांडतो असं मला वाटतं. (निबंध मुळातून वाचावा असा आहे.)

Which brings us to our last, most radical, thought: It is not clear to us that the best way to get growth is to do growth policy of any form. Perhaps making growth happen is ultimately beyond our control. Maybe all that happens is that something goes right for once (privatized agriculture raises incomes in rural China) and then that sparks growth somewhere else in economy, and so on. Perhaps, we will never learn where it will start or what will make it continue. The best we can do in that world is to hold the fort till that initial spark arrives: make sure that there is not too much human misery, maintain the social equilibrium, try to make sure that there is enough human capital around to take advantage of the spark when it arrives. Social policy may be the best thing that we can do for growth to happen and micro-evidence on how to do it well, may turn out to be the key to growth success.

जमील पॉवर्टी अॅक्शन लॅब (J-PAL) द्वारे सहयोगी NGO सोबत अनेक छोटे प्रयोग अभिजित बॅनर्जी, एस्थर डफ्लो आणि त्यांचे सहकारी राबवत आहेत. भारतातील आणि जगातील मानवी जीवन आणि विकासाच्या प्रश्नात संशोधन करू इच्छिणारे अनेक विद्यार्थी ह्या प्रकल्पांत काम करतात. आपापल्या भागांत जीवनातील प्रश्नांशी आणि अभावाशी झुंजणाऱ्या अनेक संस्थाना हे प्रयोग रिसोर्स आणि बळ प्रदान करतात.

मानवी जीवनाला गवसणी घालणारे तत्वज्ञान आणि त्याचे वाद ही निव्वळ उष्ण वाट टाळून प्रकाशाची छोटी पण भक्कम बेटे निर्माण करण्याच्या वृत्तीला २०१९ चे हे नोबेल पारितोषिक आहे.


Popular posts from this blog

Ride-hailing, Driver Power, and the Contest for Surplus in the market of shared mobility in Indian cities

The February 2026 launch of Bharat Taxi marks an unusual development in India's ride-hailing market . Unlike Uber , Ola , or Rapido —owned by private entities—Bharat Taxi is a driver-owned cooperative with visible government backing. If the government's stated ambitions materialize, this represents more than simply adding competition. It signals whose power shapes how urban mobility platforms organize themselves and distribute surplus. This article examines what Bharat Taxi's emergence tells us about driver bargaining power in India's ride-hailing market—how it never disappeared, how it reasserted itself, and where it might lead. Link Drivers Were Never Fully Atomized Standard accounts of platform capitalism emphasize how apps atomize workers—turning them into isolated contractors subject to algorithmic control. In India's ride-hailing sector, this story is incomplete. Auto-rickshaw and taxi drivers have always multi-homed across multiple apps, retained t...

Why exit polls got it so wrong?

Results of India general elections 2024 have thrown a surprise no one saw coming. NDA has secured a majority but BJP on its own has failed to secure the majority, unlike last two general elections.                No exit poll predicted this scenario. As per exit polls, BJP was going to reach majority mark on its own and NDA was going to win about 350 seats. But BJP has won 240 seats and NDA has won 292 seats. The results seem to be beyond the confidence intervals projected for the prediction. What does that say about exit polls? There are multiple possible answers to this question. I will rule out conspiracy answers at the outset. I am not going ahead with argument that exit polls were staged to help some agents. One interesting possibility that I might want to consider is false answers from voters. Respondent’s response to exit poll enumerator can be a strategic choice if respondent thinks that revealing what she...

Maharashtra Politics in June 2022 – It is perhaps a dissent against NCP and not BJP influenced coup

 It’s been a week since a political turmoil erupted in Maharashtra. Week ago, the rebellion looked like a coup covertly sponsored by BJP. But after a week, I see it somewhat differently. Image source: Here               I think the rebellion is truly a rift between Shivsena MLAs and NCP. MVA has become a ruse set up by NCP. Thackeray family have been catered while remaining leadership of Shivsena has been deprived from exploiting the power. It is a different issue why NCP must do this to Shivsena and we will not discuss that in depth here except some passing remarks. Perhaps such opportunism is a defining trait of NCP politics. We must remember that NCP is a party borne out of an ambition nourished on opportunism.             Why it is a rift between Shivsena leadership barring Thackeray and NCP? Because if it is a BJP orchestrated coup then there would have been s...