Skip to main content

Posts

Showing posts with the label वैचारिक

फैजच्या ‘हम देखेंगे’ चा वाद

फैज अहमद फैजची ‘हम देखेंगे’ ही कविता हिंदूविरोधी आहे का अशा आशयाचा वाद सुरू आहे. ही कविता शोषितांचा आवाज आहे , जुलुमी राजवट संपून समतेचे राज्य येईल असा आशय व्यक्त करणारी कविता आहे असा जनरल समज आहे. मी ही कविता पहिल्यांदा कोक स्टुडीओमध्ये ऐकली होती. कवितेची सर्वात अपिलिंग बाब आहे तो म्हणजे त्यातला विश्वास, ‘हम देखेंगे ’ . पण अगदी पहिल्या वेळेला ऐकतानाही त्यातल्या इस्लामिक संदर्भांनी मला प्रश्न पाडले होते. म्हणजे वर्गसंघर्षाचे , विषमता आणि समता ह्यांच्या संघर्षाचे चित्रण करणाऱ्या कवितेत धार्मिक संदर्भ का असावेत? आणि हे धार्मिक संदर्भ कविबद्दल , त्याच्या हेतूबद्दल काय सांगतात ? कवितेत धार्मिक संदर्भ आहेत ही निर्विवाद गोष्ट आहे. पण कवितेत धार्मिक संदर्भ धार्मिक हेतूंसाठीच आहेत का हे निर्विवाद नाही. कवितेतले धार्मिक संदर्भ हे रूपकात्मक आहेत असं मला वाटतं. म्हणजे इस्लामच्या नावाखाली स्वार्थ साधणारे दांभिक व्यक्तिकेंद्री राज्यकर्ते जातील आणि इस्लामला अभिप्रेत खरी समता येईल अशा पद्धतीने हे रूपक असावं. कविता इस्लामचा उदोउदो करणारी नसून इस्लामला रूपकात्मक वापरणारी आहे असं वाटण्य...

CAA/CAB: उदात्त हेतू आणि विसंगत आणि तोकडा कायदा

CAB संसदेत पास होऊन एक आठवडा उलटून गेलेला आहे आणि आता त्याचा कायदाही ( CAA) बनलेला आहे . ह्यानंतर NRC येणार आहे असं गृहमंत्र्यांनी सांगितलेले आहे . ह्या दोन्ही कायद्यांना एकत्र पाहिले तर त्यातून मुसलमानांना भारतातून वगळले जाईल अशी मांडणी होते आहे आणि ह्या मांडणीतून उद्भवणाऱ्या अन्यायाला प्रतिरोध म्हणून भारतातील अनेक महानगरांत , शहरांत निदर्शने होत आहेत आणि काही भागांत ही निदर्शने आणि त्यावरील पोलिसिंग हे हिंसक बनल्याचे आपण पाहतो आहोत . केवळ CAA   कायद्याबाबत काही निरीक्षणे ह्या ब्लॉगमध्ये मी नोंदवणार आहे. ह्या निरीक्षणाच्या पाठची भूमिका मी आधी नोंदवतो. माझा तत्वतः CAA कायद्याला विरोध नाही. पण हा कायदा सध्याच्या स्वरुपात न येता त्यात काही बदल होऊन यावा. ब्लॉगच्या उर्वरित भागात मी माझी भूमिका स्पष्ट करतो. CAA आणि CAB पाठचा जो उद्देश , त्या त्या देशांत धार्मिक छळ होत असलेल्या अल्पसंख्य समुदायांना संरक्षण देणे , हा स्तुत्य उद्देश आहे . आणि म्हणूनच माझा तत्वतः CAA ला पाठींबा आहे. पण CAA ह्या स्तुत्य भूमिकेची तोकडी आणि विसंगत ...