Skip to main content

Posts

Showing posts with the label अनुवाद

The Economics of Ambedkar ह्या लेखाचा अनुवाद

खालील लेख हा प्रमित भट्टाचार्य ह्यांच्या द इकॉनॉमिक्स ऑफ आंबेडकर ह्या लेखाचा अनुवाद आहे. प्रमित भट्टाचार्य ह्यांचा लेख रविवार १० एप्रिल २०१५ रोजी मिंट ह्या आर्थिक विषयावरील वृत्तपत्रातील इकॉनॉमिक्स एक्प्रेस ह्या सदरात आला होता. ( लेखाची लिंक इथे आहे .) हा अनुवाद त्यांच्या परवानगीने केलेला आहे. त्यांनी दिलेल्या परवानगीबद्दल मी प्रमित भट्टाचार्य आणि मिंट वृत्तपत्र ह्या दोघांचेही आभार मानतो.       मी केलेल्या अनुवादात मी मूळ लेखातील लेविस मॉडेल संबधातील भाग वगळला आहे. भाग वगळण्याचा निर्णय माझा आहे. हा भाग केवळ अर्थशास्त्राच्या विदयार्थ्यांना अपील झाला असता, अन्य वाचकांना नाही असे मला वाटले.       अनुवादात जिथे अधोरेखन आहे ते मी लिहिलेले आहे. काही ठिकाणी मूळ मोठे वाक्य छोट्या वाक्यांत विभागण्याची किंवा वाक्यांचा क्रम पुढे मागे करण्याची मुभा मी घेतलेली आहे. मराठी आणि इंग्लिश ह्या भाषांचा प्रवाहीपणा वेगवेगळा असल्याने असे करण्याची गरज मला वाटली. अर्थात मूळ अर्थाला धक्का लागू न देण्याची दक्षता मी होता होईतो घेतलेली आहे. भाषेची कृत्रिमता, ...