NCRB भारतातील गुन्ह्यांचा डेटा पब्लिश करते. त्यात
आत्महत्येचेही आकडे असतात. ह्या
लिंकवरून मला भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश ह्यांमधील
आत्महत्येचे आकडे मिळालेले आहेत. २००१ ते २०१२ ह्या कालावधीसाठी ही आकडेवारी
उपलब्ध आहे.
सर्वसाधारपणे शेतकरी आत्महत्या ह्या प्रिंट
आणि काही प्रमाणात सोशल मीडियातून आपले लक्ष वेधून घेत असतात. ह्या बातम्या केवळ
शेतकरी आत्महत्यांचे आकडे सांगतात. पण मुळात भारतात निम्म्याहून अधिक लोकसंख्या
शेतीवर अवलंबून आहे. समजा आपण असे मानले की शेतीशी निगडीत आणि निगडीत नसलेली ह्या दोन्ही गटांतील
लोकांची आत्महत्या करण्याची शक्यता सारखीच असते तर आत्महत्येच्या एकूण आकड्यांत
ह्या दोन गटांचे प्रमाण हे लोकसंख्येच्या प्रमाणात असेल.
Table 1: शेतीचे उपजीविकेतील आणि आत्महत्येतील प्रमाण
Year
|
% of
Total Working male Population in agriculture
|
% of
male farmers in total suicides of working population (Male)
|
% of
female total working population in agriculture
|
% of
female farmers in total suicides of working population (Female)
|
% of
total working population in agriculture
|
% of
farmers in suicides of working population
|
2001
|
43.2
|
38.7
|
77
|
41.5
|
55
|
39.1
|
2002
|
43.3
|
40.8
|
76.2
|
47.2
|
54.7
|
41.6
|
2003
|
43.4
|
41.4
|
75.4
|
47.7
|
54.5
|
42
|
2004
|
43.5
|
46.5
|
74.7
|
43.4
|
54.3
|
46.2
|
2005
|
43.5
|
45.4
|
73.9
|
38.3
|
54
|
44.8
|
2006
|
43.6
|
46.6
|
73.2
|
42.9
|
53.8
|
46.3
|
2007
|
43.7
|
44.8
|
72.4
|
37
|
53.6
|
44.2
|
2008
|
43.8
|
42.6
|
71.7
|
35.8
|
53.4
|
42.1
|
2009
|
43.9
|
33.2
|
71
|
28.8
|
53.2
|
32.9
|
2010
|
44
|
32.3
|
70.2
|
26.8
|
52.9
|
31.9
|
2011
|
44
|
33.7
|
69.5
|
33
|
52.7
|
33.6
|
2012
|
44.1
|
38.4
|
68.8
|
39.4
|
52.5
|
38.5
|
Source: 2001 Census PCA tables and Professional profiles
of Suicide Victim NCRB and Author’s calculation
|
टेबल १ मध्ये आपल्याला दिसतं आहे की
महाराष्ट्रातील एकूण working लोकसंख्येमधील जेवढी लोकसंख्या शेतीत आहे त्यापेक्षा शेतकरी
आत्महत्यांचे एकूण आत्महत्यांमधील प्रमाण कमी आहे.
Table 2: उपजीविकांचे एकूण working व्यक्तींच्या आत्महत्येतील प्रमाण
Year
|
Farmers
|
Non-agri
Self employed
|
Salaried
|
2001
|
39.1
|
40.8
|
20.0
|
2002
|
41.6
|
39.7
|
18.7
|
2003
|
42.0
|
35.9
|
22.1
|
2004
|
46.2
|
33.2
|
20.6
|
2005
|
44.8
|
32.1
|
23.1
|
2006
|
46.3
|
33.0
|
20.8
|
2007
|
44.2
|
35.5
|
20.3
|
2008
|
42.1
|
35.7
|
22.2
|
2009
|
32.9
|
43.7
|
23.4
|
2010
|
31.9
|
45.9
|
22.2
|
2011
|
33.6
|
44.1
|
22.3
|
2012
|
38.5
|
34.3
|
27.2
|
Source: Professional profile of Suicide Victims NCRB
and Author’s calculation
|
टेबल २ शेतकरी, शेतीशिवाय
अन्य असा स्वतःचा व्यवसाय करणारे आणि पगारदार ह्या तीन गटांचे एकूण कार्यरत
व्यक्तींच्या आत्महत्यांमध्ये काय प्रमाण आहे हे दाखवते. शेतकरी आणि शेतीशिवाय
अन्य स्वतःचा व्यवसाय करणारे ह्या दोन गटांचे मिळून जवळपास ८०% प्रमाण आहे.
ह्याशिवाय टेबल २ नुसार हेही दिसते की उपजीविकेच्या वर्गीकरणानुसार पाहिले तर शेती
ह्या व्यवसायाएवढीच रिस्क (आत्महत्येने दर्शित होणारी) शेतीशिवायच्या व्यावसायिकांना
आहे. (आणि नोकरदारांना नाही. आपल्या बापजाद्यांना चाकरी करण्याचे खरे सत्य उमगले
होते का काय!)
Table 3: स्तंभातील उपजीविकेतील दर १०००० घरांमागे
आत्महत्येचे प्रमाण
Year
|
Self-employed
(non-agri)
|
Farmer's
|
Salaried
|
2001
|
9
|
11
|
5
|
2002
|
9
|
11
|
4
|
2003
|
8
|
11
|
5
|
2004
|
7
|
11
|
4
|
2005
|
7
|
10
|
4
|
2006
|
7
|
11
|
4
|
2007
|
8
|
10
|
4
|
2008
|
7
|
9
|
4
|
2009
|
8
|
6
|
4
|
2010
|
9
|
7
|
4
|
2011
|
9
|
7
|
4
|
2012
|
7
|
7
|
4
|
Source: Various NSSO Employment and Unemployment
Surveys, Professional Profiles of Suicide Victims NCRB and Author’s
calculations
|
इथे थोडी सांख्यिकी स्पष्टता गरजेची आहे. टेबल १
मध्ये जे working population चे अंदाज आहेत ते २००१ आणि २०११ मधील जनगणनेच्या आकडेवारीतून आलेले
आहेत. (२००१ आणि २०११ ह्या दोन जनगणना मधील आकडेवारी वापरून वार्षिक वाढीचा दर
नक्की केला गेला आणि त्यानुसार बाकी वर्षांचा अंदाज बनवलेला आहे.) टेबल ३ चे अंदाज
हे NSSO च्या १९९९ आणि २००१
मधील Employment and Unemployment Survey मधले आहेत. असं असू शकतं की ह्या दोन सारण्या एकमेकांशी न जुळणाऱ्या
असू शकतात. टेबल ४ ह्याबाबतची स्पष्टता करतं आहे.
Table 4: Census आणि NSSO ह्यांतून मिळवलेल्या
आकडेवारीचे साधर्म्य
Year
|
% of total
working population in agriculture
|
% of total
HHs as Agricultural HHs
|
Correlation
between column 2 and column 3
|
2001
|
55.0
|
38.0
|
0.96292
|
2002
|
54.7
|
37.6
|
|
2003
|
54.5
|
37.2
|
|
2004
|
54.3
|
36.9
|
|
2005
|
54.0
|
36.6
|
|
2006
|
53.8
|
36.4
|
|
2007
|
53.6
|
36.2
|
|
2008
|
53.4
|
36.0
|
|
2009
|
53.2
|
35.9
|
|
2010
|
52.9
|
35.8
|
|
2011
|
52.7
|
35.8
|
|
2012
|
52.5
|
35.8
|
|
Source: Various NSSO employment and unemployment
surveys and Census PCA 2001 and 2011 and Author’s calculations
|
ह्या मांडणीचा हेतू शेतकरी आत्महत्या महत्वाच्या नाहीत किंवा शेतीत
सर्व आलबेल आहे असं म्हणण्याचा नाही. हेतू हा आहे की शेतकरी आत्महत्या जसे शेतीतील
क्रायसिस दर्शवतात कदाचित तसाच गंभीर क्रायसिस सेल्फ- एम्प्लॉइड गटासाठी आहे. पण
मुळात सेल्फ-एम्प्लॉइड हा एकसंध गट नाही आणि तसा तो बघितलाही जात नाही. तुलनेने
शेतकरी हे एकसंध वर्गीकरण आहे. कदाचित त्यामुळेच माध्यमांचे लक्ष शेतकरी
आत्महत्यांकडे अधिक वळते.
इथे काही शंकांचे निराकरण करावे लागेल.
मुळात शेतीशिवायचे अन्य सेल्फ एम्प्लॉइड कोण ह्याचेच पहिले उत्तर द्यावे लागेल. आत्महत्या
track करण्याचा एक चांगला
तरीका म्हणजे वृत्तपत्रात येणाऱ्या आत्महत्येच्या बातम्या. दुर्दैवाने
शेतकऱ्यांशिवाय अन्य व्यावसायिकांच्या आत्महत्यांचा फारसा वृत्तपत्रीय डेटा उपलब्ध
नाही.
दुसरी शंका म्हणजे आत्महत्यांचा हा डेटा
किती प्रमाणात अचूक आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू आत्महत्या आहे पण डेटा
मध्ये नाही अशी चूक होण्याची शक्यता काय आणि डेटामध्ये पकडलेला मृत्यू आत्महत्याच
होता ह्याची शक्यता काय.
भारतात मृत्यूंची नोंद आणि वैद्यकीय नोंद
ह्या दोन वेगळया गोष्टी आहेत. महाराष्ट्रात जवळपास ४२% नोंदवलेले मृत्यू हे
वैद्यकीय दाखल्याने प्रमाणित असतात. माझ्या स्वतःच्या आजवरच्या अनुभवाशी हे आकडे जुळत
नाहीत. पण असे सरकारी यंत्रणेचे आकडे आहेत. आणि मुद्दामून हे प्रमाण कमी दाखवण्यात
सरकारी यंत्रणेला काही स्वारस्य असेल असे नाही. म्हणजेच अशा आत्महत्या असू शकतात
ज्या वरील डेटामध्ये आलेल्या नाहीत. पण अन्य कुठल्याही मृत्यूच्या प्रकारापेक्षा
आत्महत्या नोंदविली न जाण्याची शक्यता कमी असेल. शेतकरी आत्महत्येच्या बाबतीत
वैद्यकीय नोंद घडणार नाही ह्याची शक्यता कमी आहे. ह्याचे कारण म्हणजे आत्महत्याग्रस्त
शेतकऱ्याच्या कुटुंबाला मिळू शकणारी
सामाजिक/शासकीय मदत आणि अशा आत्महत्येवर असणारा फोकस. अनेकदा वृद्ध शेतकऱ्यांच्या
नोंदीत आत्महत्यांच्या बाबतीत पंचक्रोशीत खमंग चर्चा असते! अर्थात शासकीय यंत्रणा
अशा प्रत्येक घटनेची आत्महत्या म्हणून नोंद घेईलच असे नाही. त्यामुळे अनेकदा
वृत्तपत्रे आणि शासकीय यंत्रणा ह्यांच्या
एकूण आकड्यांत तफावत असते. आत्महत्येची शासकीय नोंद करणारी यंत्रणा किती अचूक आहे
ह्यावर शेतकरी आत्महत्येची नोंद अचूकपणे झाली आहे का नाही हे अवलंबून राहील. मला
स्वतःला शेतकरी आत्महत्या घडली असता तिची नोंद न होण्याची शक्यता ही शेतकरी
आत्महत्या घडली नसताना तिची नोंद होण्याच्या शक्यतेहून कमी वाटते.
सेल्फ-एम्प्लॉइड गटाच्या बाबतीत शक्यता
ओळखणे जटील आहे. एक उदाहरण डोळ्यासमोर येते ते म्हणजे मुकेश परमार आत्महत्या. एकूणच
अशा स्वरूपाच्या व्यवसायांमध्ये असू शकणारे राजकीय संबंध, कर्जे आणि दबाव ह्यामुळे
गुन्हेगारी स्वरूपाच्या हत्या आणि डिप्रेशन आणि निराशेने होणाऱ्या आत्महत्या ह्या वेगवेगळया
करणे कठीण असेल.
--
टेबल ३ नुसार आत्महत्येच्या प्रमाणात पगारदार
गटाचे प्रमाण सर्वात कमी आहे. शेतीत हे प्रमाण सर्वात जास्त आहे. ही निरीक्षणे
अनेक प्रश्न उभे करतात.
-
एखाद्या व्यवसायातील उत्पन्न आणि त्यातील रिस्क आणि त्यातून घडू
शकणाऱ्या आत्महत्या ह्यांचे नाते काय आहे?
-
सेल्फ-एम्प्लॉइड गटात जे आत्महत्यांचे प्रमाण आहे त्याचे अधिक
पृथ्थकरण काय आहे? व्यवसायाचा आकार आणि आत्महत्या ह्यांचे प्रमाण काय आहे?
-
महाराष्ट्र आणि अन्य राज्ये ह्यांची तुलना करता काय दिसते?
-
हवामानाचा लहरीपणा आणि आत्महत्या ह्यांचे काय नाते आहे?
ह्या प्रश्नाचा अभ्यास करणारे काही अभ्यास झालेले आहेत(त्यातले
काही आणि ह्या ब्लॉग पोस्टचा डेटा). डेटा जसा जसा उपलब्ध होईल तशी त्यात भर
पडेल.
ह्या ब्लॉग पोस्ट चा उद्देश एवढा होता की शेतीतील
आत्महत्या जी रिस्क दर्शवतात ती महाराष्ट्रात साऱ्याच व्यवसायांना अनुभवावी लागते
आहे. आणि स्टार्ट-अप्स वगैरे टर्म्स डोक्यावर घेऊन नाचायाच्या दिवसांत मुळात आपल्याला
व्हेंचर कॅपिटलच्या फुग्यावर न डोलणाऱ्या देसी entrepreneur ला काय एको-सिस्टीम मिळते आहे हे नीट पहावं लागणार
आहे.
इथे शेतकऱ्याला कमी लेखायचा प्रश्न नाही. पुढील
ब्लॉगपोस्ट मधून हे मांडण्याचा प्रयत्न करण्यात येईल की शेतकऱ्यांची रिस्क बाबतची डिसिजन
मेकिंग आणि आत्महत्येचे वर्तन प्रभावित करणारे घटक ह्या गोष्टी जितक्या सोपेपणाने
मांडल्या जातात तसे नाही. आणि भावनाशील आवाहने आणि सोप्पी पण अर्धवट स्पष्टीकरणे
ह्याच्या पुढे जाऊन रीगरस आणि डेटाबेस्ड डिबेटची आपल्याला गरज आहे. आणि ही स्पष्टीकरणे
माझ्या मते दोन प्रश्नांसाठी हवी आहेत:
१.
आजही निम्म्याहून अधिक वर्किंग लोकसंख्या अवलंबून असलेल्या शेतीचं आपण
काय करणार आहोत?
२.
किमान उत्पन्न मिळवून देणारी उपजीविका प्रत्येक नागरिकाला मिळायची
असेल तर आपल्याला काय करावं लागेल?