Skip to main content

न्याय, सूड आणि प्रश्न

सरळ काही उलगडलेलं असण्याच्या पुढे आपण येऊन पोचलो आहोत.
थोडावेळ आधीपर्यंत...
१६ डिसेंबरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणात एका आरोपीने अत्यंत क्रूर वर्तन केलेलं आहे. पण हा आरोपी १८ वर्षाच्या खालील असल्याने त्याला केवळ ३ वर्षाची शिक्षा होऊन तो २० डिसेंबर २०१५ ला बालसुधारगृहातून बाहेर पडणार आहे आणि त्याला त्याचे आयुष्य जगायची संधी मिळणार आहे.
राग, संताप, चीड, हतबलता ह्या साऱ्या गोष्टींचं मिश्रण खदखदत आहे आणि आपण त्या मिश्रणाला सांगतोय की विवेकाने वाग.
त्यात आज २० डिसेंबर २०१५. दिवसभर, आज तो सुटणार, नाही सुटणार, ह्यांचं अपील, त्यांचं अपील, कायद्याची मर्यादा, लोकांचा व्यक्त होणारा राग, आणि त्या रागाशी सहमत लोक, शेकडो. त्याच्याशी तसंच वागा जसं तो तिच्याशी वागला. तसंच, तपशीलवार. त्याला अजिबात पश्चाताप नाही, तो अधिक radicalize झाला आहे, तो परत हेच करणार.
माझ्या आतला एक भाग सांगतोय, होय, त्याच्याबरोबर हेच झालं पाहिजे. त्याने जगायला नको.
दुसरा भाग म्हणतोय, तू म्हणतोस हे सगळं, मग जाऊन कर. शोध त्याला.
तिसरा म्हणतो, का? आता का लुळा पडतोस? का हा तुझा विवेक? का गांडूपणा?
ह्यातला कुठला भाग खरा?
त्यानंतर
संध्याकाळी मला हा लेख वाचायला मिळाला. नेमका, ह्याचवेळी. आणि हा लेख म्हणजे मुळावर घाव. तुम्ही ज्याला क्रौर्याचा, पाशवी वर्तनाचा अविष्कार समजता आहात तो तसा नाहीच असं म्हणणारा, आणि तेही पुरावे देऊन.
लेखातील वाक्ये
Much of the emotional anger against his release is predicated on the belief that this juvenile was the most bestial of the lot and his bestiality stood out over and above that of the rest. But facts speak otherwise. There is no mention of his beast-like behaviour in any of the records that matter in the court of law – the original FIR, the police chargesheet, testimony of both the girl and her male friend and the records of the Juvenile Justice Board. (अधोरेखन मी केलेले आहे) Firstpost is in possession of copies of these.
So the question arises…Was the juvenile the ‘most brutal’?
The answer lies in the confidential order of the Juvenile Justice Board, the statutory body that deals with matters concerning children in conflict with law. Here’s what the order, in the possession of Firstpost, says: “It is true that the juvenile has been found to be involved in the present case, but there is no evidence on record to show that he was the most brutal or he had caused the maximum damage."
Contrary to reports in the media, the Board in its confidential order on 31 August 2013 has recorded that among the six persons in the bus, two had engaged in the most barbaric behaviour– the prime accused Ram Singh, who allegedly committed suicide inside his cell in Tihar Jail, and his co-accused Akshaya Kumar Singh alias Thakur.
The co-accused – who along with others, excluding the juvenile, has now been sentenced to death by the Delhi High Court – said in his confession, which is also part of the 33-page chargesheet with annexures running into several hundred pages, that Ram Singh brutally assaulted the victim with a rod, resulting in an injury that led to her death within a fortnight.
Even the signed statements given by the victim and her companion do not suggest that the juvenile was the ‘most brutal’. In her first statement made before an executive magistrate on 21 December, five days after the incident, she revealed that all the six assailants, including the juvenile, had taken turns to rape her and inflict injuries.
She reiterated the same in her second statement that was recorded on 26 December 2012, when her medical condition had further deteriorated and she could answer questions only in writing or by way of gestures, that all the six accused had raped and brutalised her with the iron rod. There was no indication that the juvenile was any worse than the others.
The statement of the victim’s friend made before a judicial magistrate on 19 December 2012 was more precise. According to him, Ram Singh and Akshaya had taken the victim to the rear seat of the bus. At that time, he was in the grip of the juvenile and the other three accused.
लेखक त्याचा निष्कर्ष स्पष्टपणे समोर ठेवत नाही. दोन प्रकारचे निष्कर्ष येतात.    
१.       सहा आरोपींपैकी दोन, राम सिंग आणि ठाकूर, ह्यांनी सर्वात क्रूर कृत्य केले.
२.       सर्वच सहा जणांनी बलात्कार आणि सळी खुपसण्याचे कृत्य केले.
ह्याने नव्या माहितीने काय घडतं?  
१.       काहीच नाही. त्याने जरी केवळ बलात्कार केला असेल तरी तो ह्या कृत्यात तेवढाच दोषी आहे जेवढे बाकीचे. त्याला कुठलेही निष्पापपणाचे सर्टीफिकेट मिळत नाही.
२.       सगळा फोकस ह्याच्यावरच का एकवटला? ह्याला लागून प्रश्न येतात ते की हा लेख आत्ता का आला? ते लिहिणाऱ्या व्यक्तीचा उद्देश काय? हा लेख किती खरा आणि किती स्टंट?
---
तीन मुद्दे
१.       सामाजिक व्यवस्था ही त्याच्या घटक व्यक्तीपेक्षा मॅच्युअर असली पाहिजे. कायद्यानेच रक्तपिपासू बनावं अशी मागणी करून चालणार नाही. समाजासाठी असलेला कायदा हा भावना-निरपेक्ष आणि निरपराध व्यक्तीला कधीही शिक्षा न करणारा हवा. कायद्याचा उद्देश सूड नसून गुन्हेगारीचे प्रमाण कमी करणं आहे. ह्याचा अर्थ सूड ह्या भावनेला अर्थ नाही असा नाही. पण आपण सामूहिक संस्था वैयक्तिक सूड साधण्यासाठी वापरू शकत नाही. कायदा हा थंड तर्काने चालणारच हवा. तो संवेदनशील हवा, पण ज्वलनशील नको. तो मुर्दाड नको, पण म्हणून तो सुक्यासोबत ओलं जाळणारा नको. आणि कायद्यातला बदल हा कोणा एका सज्जन किंवा दुर्जन व्यक्तीसाठी होऊ शकत नाही. तो सबळ अर्ग्युमेंटवर व्हायला हवा.
आत्ता अशी दोन अर्ग्युमेंट आपल्याकडे आहेत:
अ.        १८ वर्षे ह्या वयोमर्यादेचा फेरविचार. मुळात १८ वर्षे किंवा कुठलेही वय हे काही जैविक, मानसिक आणि सामाजिक कारणांवरून ठरलेले असले पाहिजे. ते वेगवेगळया गुन्ह्यांकरता वेगवेगळे असले पाहिजे.
आ.       गुन्हेगाराच्या मानसिकतेत बदल घडतो का ह्या प्रश्नाबाबत आजवर असलेला पुरावा.
२.       आपल्या अवती-भवती घडणाऱ्या घटनांना आपण समाज आणि व्यक्ती अशा दोन्ही बाजूने प्रतिसाद देतो. माझ्या समाज म्हणून असलेल्या प्रतिसादात आणि व्यक्ती म्हणून असलेल्या प्रतिसादात फरक असू शकतो आणि नसू शकतो. मी स्वतःच्या दोन्ही बाजूंना समजून हे प्रतिसाद निश्चित केले पाहिजेत. शेवटी माझ्या मनातली स्थिर निर्णयक्षमता हाच माझ्या साऱ्या वागण्याचा अंतिम गाईड असला पाहिजे. आणि जर ही स्थिर निर्णयक्षमता मला एखाद्या सामाजिक रचनेच्या निर्णयापेक्षा वेगळं वागायला सांगत असेल तर मी तसं वागेन.
३.       सुळे परजून आवाज करणाऱ्या गर्दीत केवढेतरी प्रश्न सुटून गेले आहेत.
अ.      ह्या न्याय न्याय नावाने आवाज करणाऱ्या गर्दीतले किती लोक केवळ ह्या आरडाओरडीचा आनंद मिळवणार आहेत आणि किती सखोल अस्वस्थेतेने कृती करणार आहेत? सोशल मिडीयावरची चर्चा आपल्याला केवळ कृत्रिम जगणारे तर करत नाही ना? किती लोक खरंतर मनात, बरं झालं हे माझ्यासोबत, माझ्या जवळच्यांच्या सोबत नाही घडलं असा सुस्कारा आधी टाकतायेत, आणि मग परत न्याय, न्याय असा आवेश घेतायेत?
आ.    समजा १६ डिसेंबरच्या घटनेत पिडीत व्यक्ती मरण पावली नसती तर समाजाने काय भूमिका घेतली असती? आपण नेमके कशाने अस्वस्थ आहोत? आणि ह्यातला किती अस्वस्थपणा आपण न परखून घेतलेल्या माहितीच्या पुरवठ्याने बनलेला आहे?
इ.       मध्ये मुंबईत एक घटना घडलेली. एका विद्यार्थिनीवर तिच्या चार सह विद्यार्थ्यांनी बलात्कार केला. ह्या घटनेचा व्हिडीओ बनवला. व्हिडीओ पसरवून देऊ अशा धमकीने पिडीतेला गप्प बसवलं, मग तो व्हिडीओ व्हॉटस अॅपवर पसरला. पिडीत विद्यार्थिनीच्या गार्डियनच्या ओळखीतल्या एका व्यक्तीने ही क्लिप पाहून गार्डियनला सांगितलं. मग पोलीस तक्रार झाली. हे चार विद्यार्थी आज रिमांड होममध्ये आहेत. इथे आपण कोणा-कोणाला आणि किती शिक्षा देणार आहोत?
--
       ह्या गुन्हेगाराला आता जगू द्या असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. समजा उद्या ह्या गुन्हेगाराची हत्या झालेली बातमी मी वाचली तर मनाच्या एका कोपऱ्यात मला समाधान मिळणार आहे. माझ्यासमोर हा गुन्हेगार आला तर मी त्याच्याशी हिंसकरित्या वागेन असं मला आत्ता वाटतंय. पण मी त्याला मारण्याची जबाबदारी घेणार नाही. मी त्याची आज होणारी सुटका रद्द करा असंही अर्ग्युमेंट करणार नाही. मी कायद्याच्या फेरविचाराची मागणी करेन.
       सलमान खानच्या बाबतीतही मला हीच चीड आहे.
       पण माझ्या डिफाईन परिघात काही येत नाही तोवर माझ्या हातून कृती होण्याची शक्यता नाही. पण ह्या परिघाच्या मर्यादा कोणत्या? कुठल्या कुठल्या सूडाची किंवा अन्यायाच्या परीमार्जनाची, असं काही असेल तर, जबाबदारी माझी आहे?
       सूडाचे मला आकर्षण आहे. माझ्यासोबत घडतो तो न्याय का अन्याय हे ठरवून त्याप्रमाणे मी वागू शकेन आणि त्यामुळे सूडाच्या हिंसेचे मी नियंत्रण करू शकेन असं मला वाटतं. पण हे किती खरं आहे?
       माझ्या आजूबाजूच्या लोकांत, अगदी माझ्यात मला ठाऊक नसलेलं श्वापद असेल आणि ह्या श्वापदाला जाणू शकणारा, ताब्यात ठेवू शकणारा विवेक. सूड घेताना, न्यायाची मागणी करताना आपल्यातलं कोण ती मागणी करतंय?
--
ह्या आरोपीच्या पार्श्वभूमीबद्दल. (इथे काय आणि बाकीही ठिकाणी लोकांच्या कमेंट आधी उत्सुक आणि मग सुन्न करतात.)
(ही लिंक एका सिनेमाची. १६ डिसेंबरच्या संदर्भात नाही. हा एक कोरिअन सिनेमा आहे.)   
       बलात्कार ह्या गुन्ह्याचा प्रश्न मला कायम सतावतो, सगळ्याच बाजूने. का घडतं, कोणाकडून घडतं, परिस्थितीजन्य कारणे आहेत का मूलभूत प्रवृत्ती? व्यक्ती आणि समाज म्हणून आपण त्याच्याकडे कसं बघायचं? व्यक्तीच्या अस्तित्वातली लैंगिक डायमेन्शन खरंच किती प्रभावशाली असते? मुळात समाजाची रचनाच बलात्काराच्या गुन्ह्याला अधिक विक्राळ करते का? मग ह्या रचनेबद्दलसुद्धा विचार नको का? नुसत्या शिक्षाच ठरवून चालेल का? आणि मला हा प्रश्न भिडेल तर मी काय करेन आणि मी काय करणं बरोबर असेल?
       प्रश्नांचे मोहोळ फक्त. आणि कंपल्सरी ठेवलेली आशा की अशा अनेकांच्या अनेकविध, सतत टोचणा-या प्रश्नांचा दबाव आपल्याला एक पाउल पुढे नेईल.      

       

Popular posts from this blog

Why exit polls got it so wrong?

Results of India general elections 2024 have thrown a surprise no one saw coming. NDA has secured a majority but BJP on its own has failed to secure the majority, unlike last two general elections.                No exit poll predicted this scenario. As per exit polls, BJP was going to reach majority mark on its own and NDA was going to win about 350 seats. But BJP has won 240 seats and NDA has won 292 seats. The results seem to be beyond the confidence intervals projected for the prediction. What does that say about exit polls? There are multiple possible answers to this question. I will rule out conspiracy answers at the outset. I am not going ahead with argument that exit polls were staged to help some agents. One interesting possibility that I might want to consider is false answers from voters. Respondent’s response to exit poll enumerator can be a strategic choice if respondent thinks that revealing what she...

Balia suffers and Mumbai stares

  More than 100 have died in Balia and Deoria district of Uttar Pradesh in last few days . These districts have experienced heatwave conditions. IMD has given orange alert warning (40℃ to 45℃) for these as well as other districts in Eastern Uttar Pradesh. For those who are aware, Kim Stanley Robinson’s Climate fiction ‘The Ministry for the Future’ opens with a stunning description of heatwave related deaths in Uttar Pradesh. What is happening now in Deoria and Balia district has uncanny resemblance to what author has imagined. In some sense, we have been made aware of what awaits us, though we have decided to bury it because it is inconvenient. Even now, these deaths are not officially attributed to heatwave. Here is what I think have happened. It is a hypothesis rather than a statement with some proof. Balia and Deoria are districts near Ganga, a large water body. Rising temperatures have caused greater evaporation of this water body leading to excessive humidity in the surr...

Haunting spectre of humid summers

3 months of the summer of 2023 have passed so far. Compared to last year, this summer has been less scorching. The temperatures in Mumbai Metropolitan Region (MMR) were around 40℃ in March and April 2022. This year, it was only in April, temperatures rose to that uncomfortable level. March 2023 was surprisingly pleasant this time, more so because we anticipated something harsher. After the 23 rd April 2023, temperature have dropped by few degrees and most importantly it has become somewhat tolerable again. But this summer has left an indelible mark on our memory due to several deaths caused by heatstroke on 16 th April 2023 . Deaths of heatstroke is not the possibility one typically associates with MMR. We have train track deaths and reckless driving for such association. (Perhaps we add ‘mauled by stray dogs’ as well, if not now then in near future!) Those deaths reminded me of climate fiction ‘ The Ministry for the Future ’ by Kim Stanley Robinson. This novel opens with a clima...