Skip to main content

Posts

Showing posts from December, 2013

खुसपट

        मी (अद्याप) गे नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मला सम-लैंगिकता म्हणजे काय हे (अद्याप) कळू शकत नाही. मला असं हायपोथिसतं की कोणत्याही समूहात बरेचसे च्युते, त्याहून थोडे कमी धूर्त आणि थोडे शहाणे असं डिस्ट्रिब्युशन   असतं. मला उगाच सगळ्यांबद्दल आदर नाही, किंवा सर्वांभूती एक असं काही पण मला वाटत नाही. पण ज्याला त्याला आपल्या मनाप्रमाणे च्युत्याप करू द्यावा अशी आपली प्रामाणिक भूमिका आहे. कोणी एक उठून असं करा बघू सगळ्यांनी असं म्हटलं की नेमकं ते न करण्याची आपली बालपणापासून आवड राहिली आहे. हे चाललंय हेही त्याला धरूनच आहे!        आता न्यायालयाने सांगितलं आहे की गे सेक्स हा बेकायदेशीर आहे. वर म्हटल्याप्रमाणे ह्या कायद्याची अद्याप तरी भीती नाही. पण सोबत जे काही लिखाण पेपरात किंवा जिथे जमेल तिथे उगवू लागलं आहे तिथे सोबत अजूनही काही रुचकर आणि इशाराजनक गोष्टी येत आहेत. म्हणजे मुख मैथुन (ओरल सेक्स) आणि हस्तमैथुन हेही बेकायदेशीर आहे असं मी एकीकडे वाचलं आहे. आता आपण माझे कामजीवनाचे प्रयोग असं प्रांजळ आत्मकथन करण्याइतपत मोठे नसल्याने ...