Skip to main content

Posts

Showing posts from February, 2014

माझीही च्युत्याप अभिव्यक्ती

एखाद्या पुस्तकाला खरंच एवढे उपद्रव मूल्य असते का असा मला कायम प्रश्न पडतो. आणि शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात काय लिहिलेले आहे यामुळे खरंच विद्यार्थ्यांची इतिहास किंवा संस्कृती ह्यांची जाणीव बनते का हाही आणि त्यातून पुढे काय उपटले जाते हाही. आम्हाला अत्यंत थोर शिक्षक शाळेत इतिहास शिकवत. ते मुळात इतिहास आणि अन्य सामाजिक शास्त्रे ही केवळ एक रुचकर किंवा प्रसंगी मार्क्स मिळण्यास पौष्टिक पण कडू माहिती आहे असेच समजत. त्यामुळे ती आम्ही गप्प गिळावी आणि होईल तशी ओकावी एवढाच त्यांचा समज असे. आणि मीही तेव्हा हा गिळणे-ओकणे कार्यक्रम करून भरघोस मार्क्स मिळवून आपले आयुष्य उद्धरण्याच्या एककलमी कार्यक्रमात असे.       आज ज्या एका पुस्तकावरून धुरळा उठत आहे त्याचे पॅटर्न नेहमीप्रमाणेच आहेत. ज्यांना पड खावी लागली आहे ते कशी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आहे असा आक्रोश करत आहेत. ज्यांची लढाईत सरशी झालीआहे ते अजून युद्ध कसे बाकी आहे ते सांगत आहेत.       ह्या पर्टिक्युलर पुस्तक आणि त्याबाबत झालेल्या निर्णयात कुठे गळचेपी आहे असं मला वाटत नाही. एका व्य...