Skip to main content

Posts

Showing posts from April, 2019

जागतिक पुस्तक दिनानिमित्त काही फुटकळ निरीक्षणे

पुस्तक ह्या गोष्टीला एक वलय आहे. पुस्तके वाचणे म्हणजे काही विशेष असा समज पुस्तके वाचणाऱ्या लोकांचा आणि न वाचणाऱ्या अशा दोन्ही लोकांचा असल्याचे दिसून येते. खरेतर पुस्तके लिहिणाऱ्या लोकांनी स्वतःच्या हितासाठी हा समज पसरवला असल्याची शक्यता फार जास्त आहे! अनेक लोक वाचतात ते मनोरंजनासाठी. काही जणांना उपजीविकेसाठी वाचन करावे लागते. ज्ञान मिळवण्यासाठी वाचन करावे लागते ह्यासारखी अंधश्रद्धा दुसरी नाही. ज्ञान मिळवण्यासाठी विचार करावा लागतो, आत्मपरीक्षण करावे लागते आणि ज्ञान हे वाचनाशिवायही गवसू शकते. बुद्धाने कोणती पुस्तके वाचली होती हे आपल्याला ठाऊक आहे का? आपले जीवन सुसंगतीने जगू इच्छिणाऱ्या व्यक्तीला पुस्तकांचा फायदा होतो. अन्य व्यक्तींनी केलेले प्रयोग, त्यांना भेडसावणारे प्रश्न, त्यांनी शोधलेले पर्याय हे त्याला आपोआप समजू शकतात. संशोधक लिटरेचर रिव्ह्यू ह्याच उद्देशाने करतात. त्यांचा रिसर्च अगोदरच झालेला असेल तर ते पुनरावृत्ती टाळून पुढे जाऊ शकतात. पण वाचन हे प्रामुख्याने रंजन म्हणून केले जाते. आणि आज रंजनाची अनेकविध साधने आल्यावर वाचन आपले मुख्य स्थान गमावून बसले आहे. ह्याचा मोठा फटका वाचना...

राजू शेट्टी ह्यांचा खोडसाळ क्लेम, भरकट प्रतिवाद आणि थोडी (theoretical) आकडेमोड

सैन्यात सामाजिक गटांचे प्रमाण काय आहे आणि सैनिकी कारवाईत मरणाऱ्या सैनिकांत सामाजिक गटांचे प्रमाण काय आहे हे दोन वेगळे प्रश्न आहेत. राजू शेट्टी ह्यांचा खोडसाळ आणि राजकीयदृष्ट्या पोटेंट प्रश्न हा ‘सैनिकी कारवाईत मरणाऱ्या सैनिकांत सामाजिक गटांचे प्रमाण काय आहे’ हा आहे आणि त्याला आलेले प्रतिवाद ही ‘सैन्यात सामाजिक गटांचे प्रमाण काय आहे’ ह्या प्रश्नाची वैयक्तिक स्तरावरची मते आहेत, जी वैयक्तिक माहितीवर आधारित आहेत. पहिल्या प्रश्नासाठी डेटा नाही आणि दुसऱ्या प्रश्नासाठी डेटा परिश्रमपूर्वक गोळा करावा लागेल. पण एका theoretical उदाहरणाचा वापर करून मी ह्या दोन्ही प्रश्नांबाबत काही मते मांडणार आहे. ‘अ’ आणि ‘ब’ हे दोन आर्थिक(जसे उच्च/मध्यमवर्गीय आणि न-गरीब पण सुखवस्तूही नाहीत असे) गट आहेत. त्यांचे समाजातले प्रमाण समजा, ५% आणि ५०% आहे. (म्हणजे बाकीचे गट इथे लक्षात घेतलेले नाहीत.) सैन्यात जाण्याचा ओढा दोन्ही गटांत सारखाच आहे आणि अन्य सामाजिक गटांमध्येही सारखाच आहे. थोडक्यात सैन्यातही त्यांचे प्रमाण ५% आणि ५०% च आहे. पण सैन्यातील प्रत्येक स्तरावर हे प्रमाण सारखे नाही. ‘अ’ गट हा वरिष्ठ अधिकाऱ्यां...