2019 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार अभिजीत बॅनर्जी , एस्थर डफ्लो आणि मायकल क्रेमर ह्यांना जाहीर झालेला आहे . २०१९ चे हे अर्थशास्त्रातील नोबेल ‘ जगभरातील दारिद्र्य निर्मूलनासाठी अमलांत आणलेल्या संशोधनात्मक पावित्र्याला ’ आहे. अभिजित बॅनर्जी स्त्रोत: https://www.nobelprize.org/prizes/economic-sciences/2019/summary/ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स असे ह्या तिघांच्या संशोधन क्षेत्राचे ढोबळ वर्णन करता येईल . गरिबी किंवा दारिद्र्य निर्मूलन हा ह्या संशोधनशाखेचा एक भाग आहे. गरिबी हा ह्या संशोधन क्षेत्रातील महत्वाचा संशोधनविषय आहे , कारण जगातील बरीच लोकसंख्या आजही किमान जीवनमानाच्या अभावाने ग्रस्त आहे . पण ह्या तिघांच्या संशोधनाचे वैशिष्ट्य असे की एखाद्या फार्मा क्षेत्रातील संशोधकाने आपल्या जैव - रासायनिक प्रयोगांकडे बघावे तसा दृष्टिकोन ह्या तिघांनी आपल्या संशोधनात आणलेला आहे . Randomized control trials हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख सूत्र आहे . उदाहरणार्थ पाणी शुद्ध करण्याचे औषध उपलब्ध करून दिल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो ह्या प्रश्नाचा अभ्यास करायला दोन एकमेकां...
Guiding light for the philosopher is the consistency or non-self contradicting nature of arguments. This blog attempts to see the issues under consideration from the lens of consistency and contradiction. The objective is to point out inconsistencies and contradiction. Sometimes, I might suggest a possible improvement, but it is not an imperative.