हा लेख लोकसत्तामधील ह्या लेखाला उद्देशून आहे. (प्रतीक पुरी - उजळ माथ्यानं मिरवणारं वाङ्मयचौर्य, लोकसत्ता डिसेंबर ३०, २०१८) ‘ओरिजिनल’ ही संकल्पना माणसाला भुरळ पाडणारी आहे. विशेषतः लेखक आणि कलाकार ह्यांना ह्या संकल्पनेची फार ओढ. पण त्याचवेळी निर्मितीपाठी प्रेरणा असते असेही हाच गट मानतो. Plagiarism म्हणजे दुसऱ्याच्या संकल्पनांना आपले म्हणून सादर करणे, म्हणजेच स्वतःची अशी प्रेरणा नसणे हा ज्ञानक्षेत्रात गुन्हा मानला जातो. पण ही व्याख्या जरी सोपी असली तरी तिच्या वापरात अनेकदा ती सूक्ष्म तऱ्हेने वापरावी लागते. एक मुद्दामून रचलेले उदाहरण बघूया. एका संशोधकाने विद्यार्थ्यांच्या पालकांना दरमहिना काही पैसे दिल्यावर त्यांच्या शाळेतील कामगिरीवर काय परिणाम होतो ह्याचा अभ्यास करण्यासाठी आफ्रिका खंडातील एका देशांत एक प्रयोग केला. दोन तुलनात्मक समान गावांपैकी एका गावातील पालकांना दरमहा पैसे देण्यात आले (कंट्रोल) आणि दुसऱ्या गावांतील लोकांना पैसे देण्यात आले नाहीत. (हा प्रयोग वैज्ञानिकदृष्ट्या योग्य रहावा म्हणून ज्या काही खबरदाऱ्या घेणे गरजेचे होते त्या घेतल्या ग...
Guiding light for the philosopher is the consistency or non-self contradicting nature of arguments. This blog attempts to see the issues under consideration from the lens of consistency and contradiction. The objective is to point out inconsistencies and contradiction. Sometimes, I might suggest a possible improvement, but it is not an imperative.