CAB संसदेत पास होऊन एक आठवडा उलटून गेलेला आहे आणि आता त्याचा कायदाही ( CAA) बनलेला आहे . ह्यानंतर NRC येणार आहे असं गृहमंत्र्यांनी सांगितलेले आहे . ह्या दोन्ही कायद्यांना एकत्र पाहिले तर त्यातून मुसलमानांना भारतातून वगळले जाईल अशी मांडणी होते आहे आणि ह्या मांडणीतून उद्भवणाऱ्या अन्यायाला प्रतिरोध म्हणून भारतातील अनेक महानगरांत , शहरांत निदर्शने होत आहेत आणि काही भागांत ही निदर्शने आणि त्यावरील पोलिसिंग हे हिंसक बनल्याचे आपण पाहतो आहोत . केवळ CAA कायद्याबाबत काही निरीक्षणे ह्या ब्लॉगमध्ये मी नोंदवणार आहे. ह्या निरीक्षणाच्या पाठची भूमिका मी आधी नोंदवतो. माझा तत्वतः CAA कायद्याला विरोध नाही. पण हा कायदा सध्याच्या स्वरुपात न येता त्यात काही बदल होऊन यावा. ब्लॉगच्या उर्वरित भागात मी माझी भूमिका स्पष्ट करतो. CAA आणि CAB पाठचा जो उद्देश , त्या त्या देशांत धार्मिक छळ होत असलेल्या अल्पसंख्य समुदायांना संरक्षण देणे , हा स्तुत्य उद्देश आहे . आणि म्हणूनच माझा तत्वतः CAA ला पाठींबा आहे. पण CAA ह्या स्तुत्य भूमिकेची तोकडी आणि विसंगत ...
Guiding light for the philosopher is the consistency or non-self contradicting nature of arguments. This blog attempts to see the issues under consideration from the lens of consistency and contradiction. The objective is to point out inconsistencies and contradiction. Sometimes, I might suggest a possible improvement, but it is not an imperative.